Home Cities जळगाव जळगाव शहरात स्वच्छता वॉकचे आयोजन; नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

जळगाव शहरात स्वच्छता वॉकचे आयोजन; नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । “माझे शहर माझी जबाबदारी” आणि एस. डी. फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आज शहरातील रणछोडदास नगर परिसरात स्वच्छता वॉकचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला परिसरातील नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला.

यावेळी आरोग्य भारती देवगिरी प्रांत उपाध्यक्ष डॉ. लीना पाटील, आरोग्य भारती जळगाव उपाध्यक्ष डॉ. सुनील सूर्यवंशी, डॉ. मेघा चौधरी, डॉ. सुशीलकुमार राणे, डॉ. जयश्री राणे, डॉ. नितीन धांडे, डॉ. ज्ञानेश पाटील उपस्थित होते. तसेच मनपाचे मुख्य स्वच्छता निरीक्षक रमेश कांबळे, गांधी रिसर्च फाउंडेशनचे मदन लाठी, एस. डी. फाउंडेशनचे सुहास दुसाने यांच्यासह प्रमोद इंगळे, प्रमोद नारखेडे, जितेंद्र कोल्हे, शेखर वाणी, किरण कोल्हे, योगेश चिंचोले, पंढरीनाथ माळी, हितेंद्र टेकावडे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

स्वच्छता वॉकदरम्यान नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व, सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकण्याचे आवाहन तसेच आरोग्यदायी शहरासाठी नागरिकांची भूमिका याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. “स्वच्छ शहर, निरोगी जीवन” हा संदेश देत नागरिकांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवला.


Protected Content

Play sound