धरणगाव (प्रतिनिधी) येथील नगर परिषदतर्फे आज मंगळवार रोजी लोकमान्य टिळक यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ यांनी लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
नगर परिषदतर्फे आयोजित अभिवादन कार्यक्रमास शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ, उपनगराध्यक्षा अंजली विसावे, मुख्याधिकारी सपना वसावा, चर्मकार समाजाचे राष्ट्रीय कार्यध्यक्ष भानुदास विसावे, माजी प्रभारी नगराध्यक्ष वासुदेव चौधरी, नगरसेवक विजय महाजन, विलास महाजन, अहमद खान पठाण, जितेंद्र धनगर, सुरेश महाजन, भाजपचे गटनेते कैलास माळी, सुदेश पारेराव, उपशहर प्रमुख किरण अग्निहोत्री, तौसिप पटेल, जयेश महाजन, राहुल रोकडे, धरणगाव नगर पालिकेचे कर्मचारी, ओ.एस.संजय मिसर, दिपक चौधरी, युवराज मराठे, बाबुखा तडवी,कर निरीक्षक प्रणव पाटील, अनिल पाटील, संतोष चौधरी, किरण पाटील प्रधानमंत्री आवास योजनेचे इंजिनिअर विक्रांत चौधरी यांच्यासह धरणगाव नगरीतील आदी मान्यवर उपस्थित होते.