Home Cities यावल मोहराळा नुतन पिक संरक्षण संस्थेची कार्यकारिणी जाहीर

मोहराळा नुतन पिक संरक्षण संस्थेची कार्यकारिणी जाहीर


यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील मोहराळा येथील नुतन पिक संरक्षण संस्थेच्या चेअरमनपदी लहू रामभाऊ पाटील तर व्हाईस चेअरमनपदी भिकारी महमंद तडवी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.

मोहराळा नुतन पिक संरक्षण संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा माजी व्हाईस चेअरमन किरण रमेश चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेच्या सभागृहात पार पडली. या सभेत संस्थेच्या नुतन चेअरमन व व्हाईस चेअरमनपदासाठी निवड प्रक्रिया पार पाडण्यात आली. यामध्ये चेअरमनपदी लहू रामभाऊ पाटील व व्हाईस चेअरमनपदी भिकारी महमंद तडवी यांची उपस्थित संचालक व सभासदांच्या एकमताने निवड करण्यात आली.

या बैठकीस रमेश साळवे, धनराज पाटील, किरण रमेश चौधरी, ज्ञानेश्वर पाटील, संचालिका साधना चौधरी, सुरेखा खंबायत, संदीप पाटील, ज्ञानेश्वर रघुनाथ पाटील यांच्यासह संस्थेचे सचिव जितेंद्र खंबायत आदी उपस्थित होते. सभेत संस्थेच्या मागील वर्षातील कामकाजाचा आढावा घेण्यात आला तसेच आगामी काळात शेतकऱ्यांसाठी पिक संरक्षणाबाबत अधिक प्रभावी उपाययोजना राबवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

दरम्यान, लहू पाटील व भिकारी तडवी यांच्या निवडीबद्दल यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती उज्जैनसिंग राजपूत, माजी सभापती राकेश वसंत फेगडे, माजी सभापती हर्षल गोविंदा पाटील, भाजप यावल मंडळ अध्यक्ष सागर कोळी, तालुका सरचिटणीस ज्ञानेश्वर तायडे, भरत पाटील यांच्यासह संस्थेचे सर्व संचालक मंडळ, हरीपुरा व मोहराळा परिसरातील ग्रामस्थ तसेच शेतकरी वर्गाने अभिनंदन व स्वागत केले आहे.

नव्या नेतृत्वामुळे नुतन पिक संरक्षण संस्था अधिक सक्षमपणे कार्यरत राहील आणि तालुक्यातील शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळेल, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.


Protected Content

Play sound