Home Cities जामनेर पत्रकार दिनानिमित्त पहूर येथे केंद्रस्तरीय वक्तृत्व स्पर्धा

पत्रकार दिनानिमित्त पहूर येथे केंद्रस्तरीय वक्तृत्व स्पर्धा


पहूर, ता. जामनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मराठी पत्रकार दिनाच्या पार्श्वभूमीवर पहूर शहर पत्रकार संघटनेतर्फे शालेय विद्यार्थ्यांसाठी केंद्रस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा शनिवार, दि. ३ जानेवारी रोजी आर. टी. लेले हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या सभागृहात होणार असून विद्यार्थ्यांमधील वक्तृत्व कौशल्यांना वाव देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, विचार मांडण्याची क्षमता आणि अभिव्यक्ती कौशल्य विकसित व्हावे, यासाठी ही स्पर्धा दोन गटांत आयोजित करण्यात आली आहे. इयत्ता ५ वी ते ८ वी या गटासाठी “आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे कार्य”, “वृत्तपत्रे संपावर गेली तर…”, “मुकी झाली घरं” हे विषय देण्यात आले आहेत.

तर इयत्ता ९ वी ते १२ वी या गटासाठी “आचार्य बाळशास्त्री जांभेकर आणि तत्कालीन पत्रकारिता”, “राष्ट्रविकासात वृत्तपत्रांचे योगदान”, “माझ्या स्वप्नातील पहूर” हे विषय निश्चित करण्यात आले आहेत.

दोन्ही गटांतील विजेत्यांना प्रथम पारितोषिक १,००१ रुपये, द्वितीय ५०१ रुपये, तृतीय २५१ रुपये, तसेच उत्तेजनार्थ १०१ रुपये रोख रक्कम व स्मृतिचिन्ह देण्यात येणार आहे. सर्व सहभागी स्पर्धकांना सन्मानपत्र प्रदान करण्यात येईल.

या स्पर्धेचे बक्षीस वितरण वृत्तपत्रसृष्टीचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीदिनी, मंगळवार दि. ६ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आले आहे.

या केंद्रस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन शहर पत्रकार संघटनेचे अध्यक्ष डॉ. संभाजी क्षीरसागर, उपाध्यक्ष जयंत जोशी, सचिव सौ. गीता भामेरे यांच्यासह सर्व पत्रकार बांधवांनी केले आहे.

संक्षेप : मराठी पत्रकार दिनानिमित्त पहूर येथे शालेय विद्यार्थ्यांसाठी केंद्रस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, विविध विषयांवर विद्यार्थ्यांना आपले विचार मांडण्याची संधी मिळणार आहे.


Protected Content

Play sound