Home Uncategorized ब्रेकींग : जळगावात तरुणाची चाकू भोसकून हत्या; एकाला अटक

ब्रेकींग : जळगावात तरुणाची चाकू भोसकून हत्या; एकाला अटक

0
418

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गोलाणी मार्केट परिसरात गोलाणी मार्केट परिसरात बुधवारी ३१ डिसेंबर रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास एका १८ वर्षीय तरुणावर चाकूने जीवघेणा हल्ला करण्यात आला. दरम्यान सायंकाळी ६ वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. एकुलता एक मुलगा गेल्याने आईवडीलांनी एकच आक्रोश केल्याचे पहायला मिळाले. साई गणेश गोराडे (वय १८, रा. डीएनसी कॉलेजजवळ, जळगाव) असे मयत झालेल्या तरूणाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील डीएनसी कॉलेज परिसरात साई गोराडे हा तरूण आईवडील, बहिण आणि आजीआजोबा यांच्या सोबत वास्तव्याला होता. दरम्यान सध्या तो महाविद्यालयीन शिक्षण घेत होता. शुभम सोनवणे (रा. कालिंका माता मंदीर परिसर जळगाव) हा त्याचा महाविद्यालयीन मित्र आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या किरकोळ कारणावरून वाद होता. बुधवारी ३१ डिसेंबर रोजी सकाळी देखील दोघांमध्ये वाद झाला झाला होता. दरम्यान आज ३१ डिसेंबर असल्याने दुपारी अडीच वाजेच्या सुमारास तो गोलाणी मार्केट येथे आईला सांगून काही खाण्याच्या वस्तू खरेदी करण्यासाठी आलेला होता. याची संधी साधत शुभम सोनवणे याने गोलाणी मार्केट येथील नेक्स्ट शोरूमसमोरील रोडवर साई गोराडे याच्यावर चाकूने सपासप वार केला. त्यानंतर पळून जाण्याच्या प्रयत्नात असतांना त्याला गोलाणी मार्केटमध्ये आलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने जागीच पकडले आणि शहर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले.

या घटनेत साई हा गंभीररित्या जखमी झाल्याने त्याला खासगी वाहनातून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. त्याच्यावर प्राथमिक उपचार घेतल्यानंतर पुढील उपचारासाठी खासगी रूग्णालयात हलविण्यात आले. तेथे त्याच्यावर उपचार सुरू असतांना त्याची प्राणज्योत मालविली. यावेळी एकुलता एक मुलगा गेल्याने त्याच्या आईवडीलांनी मनहेलवणारा आक्रोश केला. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.


Protected Content

Play sound