Home Cities जळगाव राष्ट्रवादी शरद पवार गटात भाऊबंदकी : अंतर्गत वादातून अभिषेक पाटील यांचा राजीनामा...

राष्ट्रवादी शरद पवार गटात भाऊबंदकी : अंतर्गत वादातून अभिषेक पाटील यांचा राजीनामा !

0
224

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | एकीकडे महापालिका निवडणुकीचा अर्ज भरण्यासाठी अवघे काही तास उरले असतांनाच राष्ट्रवादी अजित पवार गटात अंतर्गत कलह उफाळून आला आहे. पक्षाचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांनी राजीनामा दिला असून त्यांनी गुलाबराव देवकर आणि संजय पवार यांच्या विरोधात नाराजी व्यक्त केली आहे.

जळगाव महापालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस असून सर्वच पक्षांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. तर राष्ट्रवादी अजित पवार गटात मात्र अंतर्गत कलह उफाळून आल्याचे दिसून येत आहे. खरं पाहता महायुतीत अजित पवार गटाला आधीपासूनच डावलण्यात येत असल्याचे चित्र होत्ो. भाजप आणि शिवसेनेने या गटाला कमी जागा देण्याची तयारी दाखविल्याने पक्षात अस्वस्थता होती. परवा रात्रीपासून गुलाबराव देवकर यांनी सूत्रे हातात घेत महायुतीबाबत चर्चा सुरू केली होती. तथापि, याचे गाडे काही पुढे सरकले नव्हते. यातच आता पक्षातून एक मोठी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

अजित पवार गटातील तिकिटे वाटपावरून अभिषेक पाटील यांचा गुलाबराव देवकर आणि संजय पवार यांच्याशी वाद झाला असून त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पाठवून दिला आहे. या संदर्भात पत्रकारांनी संपर्क केला असता त्यांनी या माहितीला दुजोरा दिला असला तरी याबाबत आपण आज काहीही बोलणार नसल्याचे सांगितले आहे. यामुळे त्यांचा राजीनामा नेमका कशामुळे झाला ? याबाबत चर्चेला उधाण आले आहे. तर अजित पवार गटातील संघर्ष यातून नव्याने उफाळून आल्याचे देखील अधोरेखीत झाले आहे.


Protected Content

Play sound