Home Cities जामनेर जामनेरमध्ये ज्वारी व मका खरेदी केंद्राचा शुभारंभ

जामनेरमध्ये ज्वारी व मका खरेदी केंद्राचा शुभारंभ

0
103

जामनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरणाऱ्या ज्वारी व मका खरेदी केंद्राचा शुभारंभ आज मोठ्या उत्साहात पार पडला. शेतकरी संघाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या या शासकीय खरेदी केंद्रामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना आपल्या उत्पादनाला योग्य दर मिळण्याची अपेक्षा निर्माण झाली आहे.

दिनांक 29 रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती, जामनेर येथे आयोजित कार्यक्रमात नगराध्यक्ष साधना महाजन यांच्या हस्ते ज्वारी व मका खरेदी केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी शेतकरी संघाचे चेअरमन तथा भाजपाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, बाबुराव गवळी, रमेश नाईक, नाना पाटील, मार्केट समितीचे सभापती अशोक पाटील, आबाजी पाटील, तहसीलदार नानासाहेब आगळे, पुरवठा अधिकारी नारायण सुर्वे, पुरवठा कीपर अजय ठाकूर यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शासकीय खरेदी केंद्रावर ज्वारीसाठी प्रतिक्विंटल ३६९९ रुपये तर मक्यासाठी प्रतिक्विंटल २४०० रुपये असा दर निश्चित करण्यात आला आहे. बाजारातील चढउतारांमुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांसाठी हा हमीभाव महत्त्वाचा ठरणार असून थेट शासनामार्फत खरेदी होत असल्याने मध्यस्थांचा त्रास टळणार आहे.

उद्घाटनप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी शेतकऱ्यांनी या खरेदी केंद्राचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन केले. दर्जेदार ज्वारी व मका विक्रीसाठी आणून शासकीय दराचा फायदा घ्यावा, असेही सांगण्यात आले. खरेदी प्रक्रिया सुरळीत व पारदर्शकपणे राबवली जाईल, असा विश्वास प्रशासनाकडून देण्यात आला.

जामनेर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी सुरू झालेल्या या खरेदी केंद्रामुळे ज्वारी व मका उत्पादकांना आर्थिक आधार मिळणार असून शेती उत्पन्नात स्थैर्य येण्यास मदत होणार आहे.


Protected Content

Play sound