यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रस्ता ओलांडतांना भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरने दिलेल्या धडकेत ६९ वर्षीय वृध्दाचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी घडली. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात कंटेनर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दत्तात्रय पांडूरंग जाधव वय ६९ रा. यावल ता.जळगाव असे मयत झालेल्या वृध्दाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, यावल शहरातील सानेगुरूजी शाळेजवळ दत्तात्रय जाधव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला होते. शुक्रवारी २६ डिसेंबर रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास ते फैजपूर ते यावल रस्त्यावर रस्ता ओलांडत असतांना भरधाव वेगाने येणार कंटेनर क्रमांक एमएच ४० सीएम १४४२ ने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत दत्तात्रय जाधव हे गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात ट्रकवरील चालक प्रेमसिंग मोतीलाल सिसोदिया वय ३० रा. मध्यप्रदेश याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल महाजन हे करीत आहे.




