यावल, प्रतिनिधी | येथील महावितरण कंपनीच्या माध्यमातुन शहरात नवीन वीजमीटर बसविण्यात येत आहेत. हे नवीन वीज मिटर अतिशय वेगाने धावत असल्याने पूर्ववत जुने वीजमीटर बसवावेत अशी मागणी नगरसेवक फेगडेंसह नागरिकांनी केली आहे.
नवीन वीज मीटर हे वेगाने फिरत असल्याचे ग्राहकांना निदर्शनात येत आहे. या गोंधळत नवीन विजमिटरमुळे ग्राहकांना अव्वा की सव्वा बिले येत असल्याचे ग्राहकांच्या तक्रारी आहेत. या अवाजवी येत असलेल्या वीजबिला संदर्भात तक्रार यावल शहरातील नागरिकांनी नगरसेवक डॉ कुंदन फेगडे यांच्याकडे केली. डॉ. फेगडे यांनी नागरीकांच्या या तक्रारी ची तात्काळ दखल घेत यावल महावितरणचे उपभियांता ए.बी. दमाले यांची कार्यालयात भेट घेवुन नवीन वीज मिटर हे बदलवून पुन्हा जुनेच मिटर पूर्ववत लावलेत अन्यथा महावितरण कार्यालयासमोर आंदोलन छेडू असा इशारा नगरसेवक डॉ. फेगडे यांनी दिला. यावेळी महावितरणचे उपकार्यकारी अभियंता ए.बी. दमाले यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी डॉ कुंदन फेगडे, यांच्या सोबत संजय पाटील, व्यंकटेश बारी, रितेश बारी, मनोज बारी, निर्मल चोपडे, शेखर बाविस्कर, किशोर महाजन यांच्यासह इतर नागरीक मोठया संख्येने उपास्थित होते.