नवी दिल्ली वृत्तसंस्था । पत्रकार रामचंद्र छत्रपती यांच्या हत्येप्रकरणी कुख्यात राम रहिमसह चारही आरोपींना आज न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
पत्रकार रामचंद्र छत्रपती यांनी आपल्या सायंदैनिकातून राम रहिमच्या काळ्या कृत्यांचा पर्दाफाश केला होता. यामुळे संतापलेल्या राम रहिमच्या बगलबच्च्यांनी छत्रपती यांची हत्या घडवून आणली होती. या प्रकरणी दाखल गुन्ह्यात राम रहिमलाही आरोपी करण्यात आले होते. त्याने कट रचल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. तर कुलदीपसिंग, निर्मलसिंग आणि किशनलाल हे हत्येत सहभागी होते. या प्रकरणी १२ जानेवारी रोजी पंचकुला येथील न्यायालयाने राम रहिमला दोषी जाहीर केले होते. यानंतर त्याला आज शिक्षा सुनावण्यात आली.