भरधाव कारची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी !


अमळनेर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर शहरातील गलवाडे रोडवर भरधाव वेगाने येणाऱ्या मारूती कारने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार गंभीरजखमी झाल्याची घटना गुरूवारी ११ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता घडली आहे. याप्रकरणी रविवारी १४ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात मारूती कारवरील अज्ञात चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एकनाथ राजधर पाटील वय ५७ रा. शिरूड नाका, अमळनेर हे गलवाडे रोडवरील स्वादिष्ट नमकिन येथे कामावर आहे. दरम्यान, गुरूवारी ११ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता एकनाथ पाटील हे त्यांची दुचाकी क्रमांक (एमएच १३ सीडी ८३६७) ने गलवाडे रोडवरील स्वादिष्ट नमकिन दुकानाच्या गेटवरून जात होते. त्यावेळी अमळनेरकडे जाणारी मारूती कार क्रमांक (एमएच १८ बीसी ९२०७) ने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात एकनाथ पाटील हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात कारवरील अज्ञात चालकवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ विनोद भोई हे करीत आहे.