Home क्राईम धरणगाव तालुक्यातील अल्पवयीन मुलीचे अपहरण; गुन्हा दाखल

धरणगाव तालुक्यातील अल्पवयीन मुलीचे अपहरण; गुन्हा दाखल

0
226


धरणगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची घटना शुक्रवारी १२ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता समोर आली. याप्रकरणी शनिवारी १३ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील एका गावात १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. शुक्रवारी १२ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता पिडीत मुलगी ही घरी एकटी असतांना अज्ञात व्यक्तीने काहीतरी आमिष दाखवत फूस लावून पळवून नेले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर तिच्या पालकांनी सर्वत्र शोध घेतला परंतू कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर तिच्या पालकांनी धरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात व्यक्तीविरोधात अपरहणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील


Protected Content

Play sound