कृउबास आवारातील व्यापारी संकुल बांधण्याची विकासकाला परवानगी

14

जळगाव, प्रतिनिधी | येथील कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील बिओटी तत्वावरील व्यापारी संकुल बांधण्यास नगररचना संचालक पुणे यांनी हिरवा कंदील दिला आहे.

यापूर्वी महापालिकेकडून १० मुद्यांवर मार्गदर्शन मागविण्यात आले होते. तसेच यापूर्वी दोनदा परवानगी नाकारण्यात आली होती.
याबाबत पुन्हा तीन मुद्यांवर महापालिकेकडून संचालक यांच्याकडून मार्गदर्शन मागविण्यात आले होते. यात सर्व्हिस रोड नऊ मीटरऐवजी १२ मीटर करण्याची महापालिकेची मागणी होती. आता मात्र संचालक यांनी नऊ मीटर रस्ता असावा, असा अभिप्राय दिला आहे. सर्व्हिस रोडपासून ४.५ मीटर ठेवण्यात आले आहे ते सहा मीटर अंतर ठेवण्याची मागणी महापालिकेने केली होती. दरम्यान, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आडत व्यापाऱ्यांनी ८ जून रोजी बेकायदेशीररित्या भिंत पाडल्याबद्दल आणि व्यापारी संकुलाला बेकायदेशीर परवानगी दिल्याबद्दल विरोध करत बेमुदत बंद पुकारला होता. याबाबत दी जळगाव आडत असोसिएशनने मनपा आयुक्तांना निवेदन देवून १० मुद्यांवर हरकत घेतली होती.

Protected Content