Home प्रशासन यावल-भुसावळ मार्गावरील रस्ते बुजण्यास सुरुवात ; आ. अमोल जावळेंनी घेतली दखल

यावल-भुसावळ मार्गावरील रस्ते बुजण्यास सुरुवात ; आ. अमोल जावळेंनी घेतली दखल

0
212


यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रावेर-यावल मतदारसंघाचे आ. अमोल जावळे यांनी तत्परतेने दखल घेतल्यामुळे, यावल ते भुसावळदरम्यानच्या अत्यंत धोकादायक झालेल्या राज्यमार्गावरील खड्डे बुजविण्याच्या कामाला अखेर सुरुवात झाली आहे. ‘लाईव्ह ट्रेंडस न्यूज’ने या खड्डेमय रस्त्याच्या गंभीर समस्येवर प्रकाशझोत टाकल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच प्रशासकीय यंत्रणा हलल्याने नागरिक आणि वाहनधारकांनी समाधान व्यक्त केले आहे.

यावल ते भुसावळ दरम्यानचा सुमारे १८ किलोमीटरचा हा महत्त्वाचा रस्ता गेल्या अनेक महिन्यांपासून मोठ्या खड्ड्यांमध्ये रूपांतरित झाला होता. रस्त्यावरील हे मोठे खड्डे वाहनधारकांसाठी अक्षरशः ‘मृत्यूचे सापळे’ बनले होते. खड्डे चुकवताना झालेल्या अपघातांमध्ये अनेक निष्पाप नागरिकांनी आपला जीव गमावला आहे, तर अनेकांना गंभीर दुखापतींना सामोरे जावे लागले आहे. या जीवघेण्या समस्येबाबत दोन दिवसांपूर्वी वृत्त प्रसिद्ध झाले होते.

या वृत्ताची आमदार अमोल जावळे यांनी गांभीर्याने दखल घेतली. त्यांनी त्वरित सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (PWD) अधिकाऱ्यांशी संपर्क साधून चर्चा केली आणि तातडीने रस्त्यावरील खड्डे बुजवून दुरुस्तीचे काम सुरू करण्याचे आदेश दिले. आमदारांच्या निर्देशानंतर प्रशासनाने तत्काळ पाऊले उचलत प्रत्यक्ष रस्ता दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली आहे.

या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू झाल्याबद्दल ‘लाईव्ह ट्रेंडस न्यूज’चे आभार मानत, वाहनधारकांनी आणि स्थानिक नागरिकांनी आमदार जावळे यांच्या तत्परतेबद्दल समाधान व्यक्त केले आहे.


Protected Content

Play sound