Home राजकीय परिट समाजाचा अनुसूचित जाती प्रवर्गात समावेश करा; विधानपरिषदेत खडसेंची मागणी

परिट समाजाचा अनुसूचित जाती प्रवर्गात समावेश करा; विधानपरिषदेत खडसेंची मागणी

0
146


नागपूर–लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । राज्यातील परिट समाजाला अनुसूचित जाती (एससी) प्रवर्गात समाविष्ट करण्याची मागणी विधानपरिषदेत जोरदारपणे मांडत माजी मंत्री आणि आमदार एकनाथराव खडसे यांनी शासनाने याबाबत तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, असे स्पष्टपणे सांगितले. नागपूर येथे सुरू असलेल्या अधिवेशनादरम्यान त्यांनी परिट समाजाच्या भावनांना योग्य न्याय देण्याची गरज व्यक्त केली.

आ. एकनाथराव खडसे म्हणाले की, राज्यभरातील परिट समाज बांधवांची ही मागणी अत्यंत रास्त असून ती शासनासमोर प्रभावीपणे मांडण्यासाठी समाज मोठ्या संख्येने नागपुरात दाखल झाला आहे. परिट समाजाचा एससी प्रवर्गात समावेश केल्यास सामाजिक न्याय आणि समानतेच्या दृष्टीने मोठा निर्णय ठरेल, असे ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, देशातील सात राज्यांमध्ये परिट समाजाचा अनुसूचित जाती प्रवर्गात समावेश आहे. महाराष्ट्रातही पूर्वी काही जिल्ह्यांमध्ये हा समाज एससी प्रवर्गात समाविष्ट होता; मात्र 1960 नंतर त्यांना या प्रवर्गातून वगळण्यात आले. ही ऐतिहासिक चूक दुरुस्त करून परिट समाजाला पुन्हा अनुसूचित जाती प्रवर्गात समाविष्ट करण्यासाठीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवावा, अशी आग्रही मागणी त्यांनी केली.

आ. खडसे यांनी सभागृहाचे लक्ष वेधले की, निवडणूक कालखंडात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परिट समाजासाठी संत गाडगे महाराज आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची घोषणा केली होती. मात्र या घोषणेची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. परिट समाजाच्या शैक्षणिक व आर्थिक सक्षमीकरणासाठी हे महामंडळ अत्यंत उपयुक्त ठरेल, असे नमूद करत त्यांनी विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, तसेच समाजातील उद्योजकांसाठी अनुदान व विविध सुविधा उपलब्ध करण्याची मागणी केली.


Protected Content

Play sound