Home Cities अमळनेर तोल जावून विहिरीत पडल्याने तरूणाचा बुडून मृत्यू

तोल जावून विहिरीत पडल्याने तरूणाचा बुडून मृत्यू


अमळनेर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शेतातील विहिरीत तोल जावून पडल्याने भोईवाडी येथील तरूणाचा बुडून दुदैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी ६ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. गणेश कैलास शिंगाणे वय २३ रा. भोईवाडा, अमळनेर असे मयत झालेल्या तरूणाचे नाव आहे.

पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, अमळनेर शहरातील भोईवाडा परिसरात गणेश शिंगाणे हा तरूण वास्तव्याला आहेत. दरम्यान शनिवारी ६ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता शेतात काम करत असतांना अचानक त्याचा तोल जावून विहिरीत पडला. त्यामुळे त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. परिसरातील नागरीकांनी धाव घेवून त्याला बाहेर काढले आणि अमळनेर ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी केल्यानंतर त्याला मयत घोषीत केले. याबाबत अमळनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल गर्जे हे करीत आहे.


Protected Content

Play sound