Home क्राईम धरणगावात बंद घर फोडून दीड लाखांचा ऐवज लांबविला ; गुन्हा दाखल

धरणगावात बंद घर फोडून दीड लाखांचा ऐवज लांबविला ; गुन्हा दाखल


धरणगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव शहरातील गणाबाप्पा नगरात एकाचे बंद घर फोडून घरातून सोन्याचे चांदीचे दागिने आणि रोकड असा एकुण १ लाख ४८ हजार रूपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना शुक्रवारी ५ डिसेंबर रोजी दुपारी दीड वाजता समोर आली. याप्रकरणी शनिवारी ६ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अनिल वामनराव सोनवणे वय ५८ रा. गणाबाप्पा नगर, धरणगाव हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहेत. ऑटो पार्टस् दुकान चालवून ते आपला उदरनिर्वाह करतात. ४ डिसेंबर रोजी सकाळी ९.३० वाजेपासून त्यांची घर बंद होते. याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री घराच्या दरवाजाचे मुख्य दरवाजा तोडून आत प्रवेश करत घरातून सोन्याचे व चांदीचे दागिने आणि ६० हजारांची रोकड असा एकुण १ लाख ४८ हजार रूपयांचा ऐवज चोरून नेला. हा प्रकार शुक्रवारी ५ डिसेंबर रोजी दुपारी दीड वाजता समोर आला. याप्रकरणी शनिवारी ६ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय बडगुजर हे करीत आहे.


Protected Content

Play sound