जळगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील मास्टर कॉलनी येथे इलेक्ट्रिक शॉक लागल्याने कुटुंबातील बापलेक या 2 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर 16 वर्षाची भाची गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी 5 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास घडली आहे. दरम्यान यावेळी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांनी एकाच गर्दी पाहायला मिळाली.

या बाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील मास्टर कॉलनी येथे मौलाना साबीर खान नवाझ खान (वय 35) हे आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला होते. शुक्रवारी 5 डिसेंबर रोजी सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास मौलाना साबीर यांची भाची मारिया फतेमाबी ही कपडे टाकण्यासाठी गच्चीवर गेली होती. त्यावेळी कपडे टाकत असताना जवळच असलेल्या उच्च दाबाची हाय व्होल्टेज इलेक्ट्रिक तार गेल्यानंतर तिचा जोरदार धक्का बसला, तिला वाचवण्यासाठी आलिया ही गेली असता तिला पण जोरदार धक्का बसला मुलगी आणि भाची यांना इलेक्ट्रिक शॉक लागल्याचे पाहून मौलाना शाबीर हे त्यांना वाचण्यासाठी गेले असता त्यांना देखील विजेचा जबरदस्त धक्का बसला. या घटनेत मौलाना साबीर खान (वय 38) आणि त्यांची मोठी मुलगी आलिया (वय 12) यांचा यांचा दुर्दैवी मृत्यू झाला त्यांच्यासोबत तर भाची मारिया फतेमाबी ही गंभीर जखमी झाली. तिला नजीकच्या सारा हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे.

या घटनेत मौलाना साबीर खान यांचा लहान मुलगा मात्र थोडक्यात बचावला आहे. गेल्या काही महिन्यांपासून उच्च दाबाची विद्युत वाहिनी ही घराजवळून गेल्याने या परिसरातून हे विद्युत वाहिनी हटवावी, अशी मागणी करण्यात आलेली होती. परंतु महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे या मागणीकडे दुर्लक्ष झाल्याने ही घटना घडली आहे असा सांगतात येथील परिसरातील नातेवाईकांनी केला आहे.



