Home राजकीय रावेरच्या राजकारणात भूकंप! राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष महेमूद शेख यांचा भाजपमध्ये प्रवेश

रावेरच्या राजकारणात भूकंप! राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष महेमूद शेख यांचा भाजपमध्ये प्रवेश


रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रावेर शहराच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली असून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष महेमूद शेख यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. राज्याचे वजनदार मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. यामुळे रावेर शहरातील मुस्लिम मतदारांवर मोठा प्रभाव असलेल्या एका महत्त्वाच्या चेहऱ्याला भाजपने आपल्याकडे खेचल्याने आगामी निवडणुकीच्या दृष्टीने भाजपची शहरात मोठी ताकद वाढल्याचे मानले जात आहे.

माजी आमदार अरुण पाटील आणि आमदार अमोल जावळे यांच्यासह भाजपच्या अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत महेमूद शेख यांनी भाजपचे कमळ हाती घेतले. यावेळी महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा डॉ. केतकी पाटील, भाजपचे ज्येष्ठ नेते सुरेश धनके, बाजार समिती सभापती प्रल्हाद पाटील, भाजप जिल्हा उपाध्यक्ष अरुण शिंदे, तालुकाध्यक्ष रविंद्र पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

महेमूद शेख यांच्या पक्षप्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला रावेर शहरात मोठा राजकीय धक्का बसला आहे. शेख यांचा मुस्लिम समाजात मोठा जनसंपर्क आणि प्रभाव आहे. त्यांच्या या निर्णयामुळे भाजपला अल्पसंख्याक समुदायात मोठा राजकीय फायदा होण्याची चिन्हे आहेत. मंत्री गिरीश महाजन यांनी महेमूद शेख यांचे पक्षात स्वागत केले आणि त्यांच्या येण्यामुळे पक्ष संघटना अधिक मजबूत होईल, असा विश्वास व्यक्त केला.


Protected Content

Play sound