Home क्रीडा किंग कोहलीची रायपूरमध्ये पुन्हा धडाकेबाज शतकी खेळी ; दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सलग दुसरे...

किंग कोहलीची रायपूरमध्ये पुन्हा धडाकेबाज शतकी खेळी ; दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सलग दुसरे शतक 


रायपूर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । टीम इंडियाचा धडाडीचा फलंदाज विराट कोहली पुन्हा एकदा आपल्या शतकी खेळीने क्रिकेटप्रेमींच्या नजरा खिळवून ठेवत आहे. रांची वनडेत शतक ठोकल्यानंतर आज रायपूरमध्येही त्याने धमाकेदार शतक झळकावलं. या खेळीमुळे भारताची स्थिती भक्कम झाली असून कोहलीने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील आणखी काही विक्रमांना स्पर्श करत इतिहासात नव्या नोंदी केल्या आहेत.

रायपूर वनडे सामन्यात कोहलीने 90 चेंडूत 7 चौकार आणि 2 षटकारांच्या जोरावर 100 धावा पूर्ण केल्या. त्याचा 111.11 चा स्ट्राईक रेट पाहताच त्याच्या खेळीतील आक्रमकता जाणवत होती. तिसऱ्या विकेटसाठी ऋतुराज गायकवाडसोबत त्याने केलीली 195 धावांची महत्वाची भागीदारी टीम इंडियाला 250 धावांचा टप्पा ओलांडण्यास निर्णायक ठरली. या कामगिरीने त्याच्या वनडेमधील 53व्या आणि आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 84व्या शतकाची नोंद झाली.

विराटने सलग दोन किंवा अधिक वनडे डावांमध्ये आता तब्बल 11 वेळा शतके झळकावण्याचा पराक्रम केला असून या यादीत तो सर्वोच्च स्थानी पोहोचला आहे. त्याच्या मागे दक्षिण आफ्रिकेचा एबी डिव्हिलियर्स सहा शतकांसह दुसऱ्या तर रोहित शर्मा चार शतकांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. रायपूरमधील त्याच्या 105 धावांच्या शतकी खेळीत 83 चेंडूंमध्ये 12 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता.

या शतकासह कोहलीने न्यूझीलंडचा स्टार फलंदाज केन विल्यमसनच्या विक्रमाचीही बरोबरी केली. दोघांनीही दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडेमध्ये तीन शतकांची कमाई केली आहे. 2023 च्या कोलकाता वर्ल्डकप सामन्यातील 101 नाबाद धावा, रांची 2025 मधील 135 धावा आणि रायपूर 2025 मधील 105 धावा—या तीनही खेळींनी त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धची शतकांची हॅटट्रिक पूर्ण केली आहे.

कोहली आता असा एकमेव फलंदाज ठरला आहे ज्याने चार वेगवेगळ्या संघांविरुद्ध किमान सात किंवा त्यापेक्षा अधिक शतके झळकावली आहेत. श्रीलंका (10), वेस्ट इंडिज (9), ऑस्ट्रेलिया (8) आणि दक्षिण आफ्रिका (7) असे त्याचे आकडे पाहता या विक्रमातही तो अग्रस्थानी आहे. जगप्रसिद्ध सचिन तेंडुलकरने आपल्या कारकिर्दीत फक्त ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका या दोन संघांविरुद्धच सातपेक्षा जास्त शतके झळकावली होती, मात्र कोहलीने या यादीत चार संघांचा समावेश करत क्रिकेटविश्वात आपली वेगळी छाप उमटवली आहे.


Protected Content

Play sound