Home Cities जळगाव मोठी बातमी : नगरपालिका निवडणुकीचा निकाल 21 डिसेंबरला !

मोठी बातमी : नगरपालिका निवडणुकीचा निकाल 21 डिसेंबरला !


नागपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । आज मतदान होणाऱ्या नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल हा उद्या नव्हे तर 21 डिसेंबर रोजी जाहीर होणार असून आज नागपूर खंडपीठाने हा निकाल दिला आहे.

राज्यभरात आज नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी मतदान होत आहे. नियोजीत कार्यक्रमानुसार या निवडणुकीचा निकाल हा तीन डिसेंबर रोजी लागणार होता. तथापि, निवडणुकीबाबत नागपूर खंडपीठात दाखल असलेल्या याचिकेवर आज सुनावणी झाली. यात या याचिकेवरील निकाल हा 21 डिसेंबर रोजी लागणार असल्याने या निवडणुकीची मतमोजणी ही 21 डिसेंबर रोजीच करण्यात यावी असा निकाल नागपूर खंडपीठाने दिला आहे.

राज्य निवडणूक आयोगाने आधीच न्यायालयीन प्रक्रियेत असलेल्या नगरपालिका आणि प्रभागांमधील निवडणुका 20 डिसेंबर पर्यंत पुढे ढकलल्या आहेत. यामुळे आता त्या निवडणुका झाल्यावरच आज होणाऱ्या मतदानाचा निकाल लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

​एकाच टप्प्यातील निवडणुकांचे निकाल आधी लागल्यास, त्याचा परिणाम २० डिसेंबरला होणाऱ्या मतदानावर होऊ शकतो, या कारणास्तव मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. त्यानुसार, आज मतदान झालेल्या आणि २० डिसेंबरला मतदान होणाऱ्या सर्व जागांची मतमोजणी आता एकत्रितपणे २१ डिसेंबर रोजी घेतली जाणार आहे. तोपर्यंत म्हणजे 21 डिसेंबरपर्यंत आचारसंहिता कायम राहणार आहे. तर आज होणाऱ्या मतदान प्रक्रियेवर या निकालाचा कोणताही परिणाम होणार नाही असे खंडपीठाने स्पष्ट केले आहे.

आज मतदान प्रक्रिया संपल्यानंतर ईव्हीएम मशिन्स सील करण्यात येणार आहेत. दुसऱ्या दिवशी निकाल लागणार असल्याने उमेदवारांवरील ताण कमी झाला होता. मात्र, आता निकाल थेट १९ दिवसांनी लागणार असल्याने उमेदवारांचा जीव टांगणीला लागला आहे.


Protected Content

Play sound