जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील काशिनाथ चौकात बसमधील सिटवर बसण्याच्या कारणावयन एका तरूणाला शिवीगाळ करत मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना रविवारी ३० नोव्हेंबर रोजी पहाटे ४ वाजता घडली आहे. याप्रकरणी दुपारी अडीच वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अदाखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, शेख कासम शेख युनूस शेख वय ४० रा. मेहरूण, जळगाव हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहेत. रविवारी ३० नोव्हेंबर रोजी पहाटे ४ वाजता ते बसमध्ये बसलेले असतांना बसमधील सिटवर बसण्याच्या कारणावरून शेख कासम यांना रमेश अशोक सोनवणे रा. चिखली ता. बुलढाणा याने शिवीगाळ करत मारहाण केली. हा प्रकार घडल्यानंतर शेख कासम यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अदाखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक पंकज पाटील हे करीत आहे.




