जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । ठेकेदारीचा व्यवसाय करण्यासाठी माहेराहून वारंवार पैसे आणण्याची मागणी करत झालेल्या त्रास देत अक्सा नगर येथील विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शुक्रवारी २८ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात पतीसह सासू यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हमीदाबी जावेद कुरेशी रा. अक्सा नगर, जळगाव असे मयत झालेल्या विवाहितेचे नाव आहे.

मयत विवाहितेचा भाऊ शेख हसन शेख हुसेन रा.बुऱ्हाणपूर, मध्यप्रदेश यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांची बहिण हमीदाबी जावेद कुरेशी यांचे सासर जळगाव येथील अक्सा नगरात आहे. त्यांचे पती जावेद अजिज कुरेशी यांनी विवाहितेला माहेराहून ठेकेदारीचा व्यवसाय करण्यासाठी माहेराहून पैसे आणावे अशी मागणी केली होती. दरम्यान विवाहितेने माहेराहून पैसे आणले नाही,त्यामुळे तिला शिवीगाळ करत मारहाण करण्यात आली होती. सततच्या या त्रासाला कंटाळून विवाहिता हमीदाबी जावेद कुरेशी यांनी १५ नोव्हेंबर रोजी राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. हा प्रकार घडल्यानंतर मयत महिलेच्या नातेवाईकांनी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आक्रोश केला होता. मयत विवाहितेवर अंत्यसंस्कार केल्यानंतर अखेर शुक्रवारी २८ नोव्हेंबर रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली. त्यानुसार पोलीस ठाण्यात पती जावेद अजिज कुरेशी आणि सासू सकीनाबी अजिज कुरेशी या दोघांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अशोक काळे हे करीत आहे.



