Home क्राईम ब्रेकींग : प्रेम प्रकरणातून तरुणाचा चाकूने भोसकून निर्घृण खून !,...

ब्रेकींग : प्रेम प्रकरणातून तरुणाचा चाकूने भोसकून निर्घृण खून !, मुक्ताईनगरात खळबळ

0
512


मुक्ताईनगर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर शहरात रविवारी २३ नोव्हेंबर सायंकाळच्या सुमारास एका तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. शहरातील हॉटेल वृंदावन समोरील प्लॉटिंग भागात एका मोकळ्या जागेत हा मृतदेह मिळून आला. सदर तरुणाचा चाकू भोसकून निर्घणपणे खून करण्यात आल्याचे समोर आले आहे. ही हत्या प्रकरण प्रेमसंबंधातून घडले असावे, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

विष्णू गोसावी (वय २६, रा. मुक्ताईनगर) असे मयत तरुणाचं नाव असून, तो गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता होता. रविवारी २३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास काही नागरिकांना प्लॉटिंगच्या ठिकाणी हा मृतदेह दिसला, त्यानंतर त्यांनी तात्काळ मुक्ताईनगर पोलिसांना याची माहिती दिली. माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. काही तरुणांनी मृतदेहाची ओळख पटवल्यानंतर पोलिसांनी पंचनामा केला आणि मृतदेह पुढील तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. मृतदेहाची स्थिती आणि घटनास्थळावरून हा खून असल्याचे स्पष्ट होत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेमागे प्रेम प्रकरणातून निर्माण झालेल्या वादाचा किंवा सूडाचा संबंध असण्याची दाट शक्यता आहे. या दृष्टीने पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली असून, विष्णू गोसावी याचे कोणासोबत प्रेमसंबंध होते आणि तो बेपत्ता झाल्यानंतर कोणत्या व्यक्तींच्या संपर्कात होता, याची कसून चौकशी सुरू आहे.

या घटनेमुळे मुक्ताईनगर शहरात भीतीचे आणि तणावाचे वातावरण पसरले आहे. रात्री उशिरापर्यंत मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. पोलिसांनी मारेकऱ्यांचा तातडीने शोध घेण्यासाठी पथके रवाना केली असून, या गूढ खुनामागील सत्य लवकरच समोर येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


Protected Content

Play sound