Home आरोग्य  डॉ. अमित राणे यांची जळगावात आरोग्य सेवा उपलब्ध

 डॉ. अमित राणे यांची जळगावात आरोग्य सेवा उपलब्ध

0
120

जळगाव–लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बाब म्हणजे प्रसिद्ध व्हॅस्कुलर सर्जन डॉ. अमित राणे यांची आरोग्य सेवा आता शहरातच उपलब्ध झाली आहे. व्हेरिकोस व्हेन्सपासून गँगरीनपर्यंत, तसेच जटिल रक्तवाहिन्यांशी संबंधित गंभीर आजारांवर तज्ज्ञ उपचार जळगावात मिळणार असल्याने अनेक रुग्णांना मोठा फायदा होणार आहे.

जळगावातील रिंग रोड परिसरातील महेश प्रगती मंडळासमोरील तुषार पॅथॉलॉजी येथे दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी तसेच रविवारी ही सेवा उपलब्ध राहणार आहे. दीर्घकाळापासून रक्तवाहिन्यांच्या आजारांसाठी पुणे-मुंबई गाठणाऱ्या रुग्णांना आता हे उपचार शहरातच मिळणार आहेत. व्हेरिकोस व्हेन्स, न भरणाऱ्या जखमा, जुन्या जखमा, चालताना पाय दुखणे, डायबेटिक फूट, स्ट्रोकशी संबंधित रक्तवाहिन्यांचे त्रास, एओरटिक अन्यूरिसम, एओरटिक डिसेक्शन, डायलिसीससाठी आवश्यक एबी फिस्टुला, परमकैथ तसेच डीप व्हेन थ्रोम्बोसिस आणि पल्मनरी एम्बोलिसमसारख्या रक्तगुठळ्यांचे निदान व उपचार येथे उपलब्ध राहतील.

या निमित्ताने गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, डॉ. तुषार बोरोले, डॉ. निलीमा बोरोले, सदस्या डॉ. केतकी पाटील, हृदयरोग तज्ज्ञ डॉ. वैभव पाटील आणि डॉ. नुपूर राणे यांनी डॉ. राणे यांचे मनापासून स्वागत केले. अत्याधुनिक उपचारपद्धती व रुग्णकेंद्रित दृष्टिकोनासाठी ओळख असलेल्या डॉ. राणेंच्या जळगावातील उपस्थितीचे वैद्यकीय क्षेत्रातही स्वागत होत आहे.

डॉ. अमित राणे हे अत्यंत कुशल, प्रशिक्षित आणि समर्पित व्हॅस्कुलर व एंडोव्हस्कुलर सर्जन आहेत. त्यांनी मिरज येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस पूर्ण केल्यानंतर मुंबईतील राजावाडी रुग्णालयात सर्जिकल हाऊसमन म्हणून काम केले. त्यानंतर पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक येथे जनरल सर्जरीमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले. या काळात त्यांनी राष्ट्रीय परिषदांमध्ये संशोधन पत्रे सादर करून शैक्षणिक क्षेत्रातही उल्लेखनीय योगदान दिले.

यानंतर त्यांनी प्रा. डॉ. डी.आर. कामेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली रुबी हॉल क्लिनिकमध्ये डीएनबी व्हॅस्कुलर सर्जरी ही सुपर-स्पेशालिटी पूर्ण केली. प्रशिक्षणाच्या काळात महाराष्ट्रासह आसपासच्या राज्यांमधून ते व्हॅस्कुलर सर्जरीचे एकमेव रहिवासी होते, हे त्यांच्या कौशल्याचे मोठे द्योतक ठरते. आधुनिक तंत्रज्ञान वापरून रुग्ण-केंद्रित उपचार देण्याचा त्यांचा दृष्टिकोन आणि शस्त्रक्रिया नवोपक्रमातला आवड त्यांना विशेष ओळख निर्माण करून देतो.


Protected Content

Play sound