Home राजकीय केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याहस्ते रावेरमध्ये भाजप-शिंदे गट युतीचे संयुक्त कार्यालय उद्घाटन 

केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याहस्ते रावेरमध्ये भाजप-शिंदे गट युतीचे संयुक्त कार्यालय उद्घाटन 

0
171


सावदा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रावेर नगरपरिषद निवडणुकीची जोरदार चाहूल लागत असताना भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना (एकनाथ शिंदे गट) युतीने संयुक्त निवडणूक कार्यालयाचे भव्य उद्घाटन करत निवडणूक प्रचाराला औपचारिक सुरुवात केली आहे. इंदिरा गांधी चौकात पार पडलेला हा सोहळा कार्यकर्त्यांच्या उसळलेल्या उत्साहाने आणि घोषणांनी दुमदुमून गेला.

केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते कार्यालयाचे उद्घाटन संपन्न झाले. उद्घाटनप्रसंगी रावेर लोकसभा प्रमुख नंदकिशोर महाजन, माजी आमदार अरुण पाटील, डॉ. केतकीताई पाटील, तसेच डॉ. अतुल सरोदे यांची उपस्थिती लाभली. भाजप आणि शिंदे गटातील पदाधिकारी, युतीचे उमेदवार आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

उद्घाटनानंतर बोलताना केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी युतीच्या उमेदवारांना शुभेच्छा देत सांगितले की आगामी निवडणुकीत विकास, पारदर्शकता आणि जनसेवा हा युतीचा मुख्य ध्यास असेल. नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी दोन्ही पक्ष एकदिलाने कार्यरत राहतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

इंदिरा गांधी चौक परिसरात झालेल्या या कार्यक्रमास प्रचंड गर्दी झाली होती. घोषणांनी परिसर दणाणून गेला होता आणि संपूर्ण वातावरणात निवडणुकीचा जल्लोष जाणवत होता. कार्यकर्त्यांच्या उत्साहामुळे रावेरच्या राजकीय रंगतिला नवचैतन्य लाभल्याचे चित्र उपस्थितांना पाहायला मिळाले.


Protected Content

Play sound