जळगाव–लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जिल्ह्यातील प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या जामनेर नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी पुन्हा एकदा साधनाताई गिरीश महाजन यांची निवड होत तिसऱ्यांदा नगराध्यक्षपदाचा मान मिळाला आहे. विशेष म्हणजे यावेळी त्यांची निवड बिनविरोध झाली असून या विजयाने कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह आणि आनंद व्यक्त झाला. निवडणुका जाहीर झाल्यानंतर जामनेरमधील ही पहिलीच मोठी राजकीय घडामोड मानली जात असून भाजपमध्ये आनंदोत्सवाचे वातावरण निर्माण झाले.

आज गुरुवार (२० नोव्हेंबर ) रोजी सायंकाळी जी.एम. फाउंडेशनमधील भाजप कार्यालयात आमदार राजू मामा भोळे यांच्या प्रमुख उपस्थितीत या विजयाचा भव्य जल्लोष साजरा करण्यात आला. कार्यकर्त्यांनी फटाके फोडून, पेढे वाटप करून आणि ढोल–ताशांच्या गजरात आनंद व्यक्त केला. जामनेरमधील नागरिकांमध्येही त्यांच्या बिनविरोध निवडीबद्दल समाधान व्यक्त होत असून नगरपालिकेच्या आगामी कारभाराविषयी सकारात्मक अपेक्षा वाढल्या आहेत.

विजयानंतर आयोजित करण्यात आलेल्या या आनंदोत्सवाला भाजपा जळगाव महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, माजी महापौर भारती सोनवणे, नितीन लढ्ढा, माजी जिल्हाध्यक्ष उज्वला बेंडाळे, जिल्हा पदाधिकारी विशाल त्रिपाठी, राहुल वाघ, राजेंद्र मराठे, राजेंद्र घुगे पाटील, रेखा वर्मा, गायत्री राणे, सुरेखा तायडे, पितांबर भावसार, दीपक परदेशी, भूषण लाडवंजारी, मनोज भांडारकर, संजय शिंदे, मंडल अध्यक्ष आनंद सपकाळे, दीपमाला काळे, अजित राणे, विनोद मराठे, अतुल बारी, गीतांजली ठाकरे, रेखा कुलकर्णी, सविता बोरसे तसेच माजी नगरसेवक, जिल्हा पदाधिकारी आणि असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



