Home Cities अमळनेर दहा किलो गांजा बाळगणाऱ्यास धुळ्यातील एकाला अटक !

दहा किलो गांजा बाळगणाऱ्यास धुळ्यातील एकाला अटक !

0
117


अमळनेर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अंमली पदार्थांची विक्री करण्यासाठी दुचाकीवरून गांजा घेऊन जात असलेल्या एकाला अमळनेर पोलीस स्टेशनच्या पथकाने सापळा रचून सोमवारी १७ नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजता अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी १० किलो ५९० ग्रॅम वजनाचा गांजा आणि दुचाकी जप्त केली. याबाबत रात्री ९ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

नंदगाव ते अमळनेर रोडवरील बोरी नदीच्या पुलालगत कच्च्या रस्त्यावर पोलिसांनी सापळा लावला होता. संशयित आरोपी भोजू सुरेश पवार (वय ३४, राहणार बभळाज, जिल्हा धुळे) हा त्याच्या ताब्यातील होंडा कंपनीच्या काळ्या रंगाच्या दुचाकी क्रमांक (एमएच १८, सीडी ७३२६) वरून बेकायदेशीररीत्या गांजा घेऊन विक्रीसाठी अमळनेरकडे येत होता. पोलिसांनी त्याला तात्काळ ताब्यात घेतले.

तपासणीदरम्यान, त्याच्याकडून २ लाख १० हजार रुपये किमतीचा १० किलो ५९० ग्रॅम गांजा आणि दुचाकी जप्त करण्यात आली. पोलीस कर्मचारी गणेश पाटील यांच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस स्टेशनमध्ये आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Protected Content

Play sound