Home क्राईम महिलेला वेश्याव्यवसायास लावणाऱ्या पती-पत्नीवर गुन्हा दाखल

महिलेला वेश्याव्यवसायास लावणाऱ्या पती-पत्नीवर गुन्हा दाखल

0
312

चोपडा लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध अधिनियम अंतर्गत एका महिलेला तिच्या इच्छेविरुद्ध वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडून तिच्या कमाईवर उपजिविका करणाऱ्या पती-पत्नीवर अडावद पोलीस स्टेशनमध्ये सोमवारी १७ नोव्हेंबर रोजी दुपारी अडावद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत अधिक माहिती अशी की, चोपडा तालुक्यातील धानोरा गावातील रहिवासी चंद्रकांत सुपडू सोनवणे (वय ४५) आणि त्यांची पत्नी शीला चंद्रकांत सोनवणे (वय ४२) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी मूळ येलदरी, जि. हिंगोली येथील रहिवासी असलेल्या पीडित महिलेला त्यांच्या राहत्या घरात आणले होते. आरोपींनी पीडितेच्या इच्छेविरुद्ध तिला वेश्याव्यवसायास प्रवृत्त केले आणि तिच्या कमाईवर तो आपले पोट भरत असल्याचे कारवाई दरम्यान स्पष्ट झाले.

माहिती मिळाल्यानंतर, अडावद पोलीस स्टेशनमधील महिला पोलीस कॉन्स्टेबल दिव्या रघुनाथ मराठे यांनी फिर्याद दाखल केली. या गुन्ह्याची नोंद अडावद अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि प्रमोद वाघ करीत आहेत.


Protected Content

Play sound