भुसावळ प्रतिनिधी । येथील हिंदू जनजागृती समिती व शिववंदना हिंदू संगठन व गौसेवा परिवार यांच्या वतीने श्री अष्ठभुजा माता मंदिर समोर विविध मागण्यांसाठी आज आंदोलन करण्यात आले.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, धुले येथील गौसेवक चेतन शर्मा यांना ज्या लोकांनी मारहाण केली त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. नागा साधु यांच्या अपमान होईल असा चित्रपट प्रदशित होऊ नये, लाल कैप्टन नावाचा पिक्चर आहे. गोसेवकाना सुरक्षा व गौमाताला राष्ट्रीय पशु घोषित करण्यात यावे. इयत्ता शाळाची पुस्तक मध्ये महाराणा प्रताप यांच्या एकेरी उल्लेख करण्यात आला आहे त्यांच्या निषेध व्यक्त केला आहे. यासह विविध मागण्यांसाठी अश्या विविध मांगनी करण्यात आली.
विविध मागण्यांसाठी उद्या देणार निवेदन
उद्या 22 जुलै रोजी सकाळी 11 वाजता प्रांत अधिकारी यांना समस्त हिंदूच्या वतीने निवेदन देण्यात येणार आहे. प्रसंगी भूषण महाजन, उमाकांत(नमा) शर्मा, उमेश जोशी, पीयूष महाजन, शुभम रूमकर, मनोज चौधरी, राजेश ठाकुर, शुभम पचरेवाल, रविंद्र भोई, चेतन भोई, रितेश जैन, गोसेवक रोहित महाले, जितु पवार, पवन बॉक्से, रोहित शेडक़े, सागर भोई, पवन पाटिल, आदित्य पाटिल, रूपेश तायड़े आदि हिंदू निष्ठ कार्यकर्ते उपस्थित होते.