Home क्राईम ब्रेकींग : सासरचा छळ, सातत्याने पैशांची मागणी, विवाहितेनं संपवलं जीवन, कुटुंबियांचा अक्रोश...

ब्रेकींग : सासरचा छळ, सातत्याने पैशांची मागणी, विवाहितेनं संपवलं जीवन, कुटुंबियांचा अक्रोश !

0
185


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील अक्सा नगर येथे राहणाऱ्या एका विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी १५ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास समोर आले आहे. दरम्यान पतीसह सासरच्या मंडळींनी पैशांसाठी विवाहितेला बेदम मारहाण करून त्याला गळफास देऊन तिचा खून केल्याचा आरोप विवाहितेच्या आईवडील व भाऊ यांनी केला आहे. यावेळी रविवारी १६ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विवाहितेच्या माहेरच्या लोकांनी एकच आक्रोश केला होता. हमीदाबी जावेद कुरेशी (वय ३०, रा. अक्सा नगर, जळगाव) असे मयत विवाहितेचे नाव आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील अक्सा नगर परिसरामध्ये हमीदाबी जावेद कुरेशी या विवाहिता आपले पती, तीन मुलं व सासरच्या मंडळींसोबत वास्तव्याला होत्या. गेल्या काही वर्षांपासून त्यांच्याच कौटुंबिक वाद होता. विवाहितेला सासरच्या लोकांनी पैशांची मागणी केली. तसेच किरकोळ कारणावरून छळ करण्यास सुरुवात केली. दरम्यान शनिवारी १५ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास विवाहितेने राहत्या घरात घेऊन आत्महत्या केली. परंतु ही आत्महत्या नसून तिचे पती आणि सासरच्या मंडळींनी मुलीला मारहाण करून गळफास देऊन तिचा खून केल्याचा आरोप विवाहितेचे आई जरीनाबी शेख हुसेन, वडील शेख हुसेन शेख इब्राहिम आणि भाऊ शेख हसन शेख हुसेन यांनी केला आहे.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर विवाहितेच्या आई-वडील आणि माहेरच्या नातेवाईकांनी जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात धाव घेतली. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केल्याचे पाहायला मिळाले. दोषींना अटक करून त्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी विवाहितेच्या माहेरच्या लोकांनी केली आहे. शेवटचे वृत्त हाती आले, तेव्हा एमआयडीसी पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

मयत विवाहितेच्या पश्चात तिचे आई-वडील भाऊ आणि साजिद (वय ९), अहमद (वय ७) आणि फरहान (वय ३) अशी तीन मुले असा परिवार आहे.


Protected Content

Play sound