Home क्राईम अशोक नगरात तरूणाचे बंद घर फोडून चांदीच्या मुर्त्यांची चोरी

अशोक नगरात तरूणाचे बंद घर फोडून चांदीच्या मुर्त्यांची चोरी

0
161

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अशोक नगरात तरूणाचे बंद घर फोडून घरातून ३० हजार रूपये किंमतीच्या चांदीच्या मुर्त्या चोरून नेल्याची घटना गुरूवारी १३ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास समोर आली आहे. याबाबत दुपारी ४.३० वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेमंत विजय महाजन वय ३९ रा. अशोक नगर, जळगाव हा तरूण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. १२ नोव्हेंबर रोजी रात्री १० वाजेपासून त्याचे घर बंद होते. त्यावेळी अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरातून ३० हजार रूपये किंमतीच्या चांदीच्या मुर्त्या चोरून नेले. हा प्रकार १३ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास उघडकीला आला आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर हेमंत महाजन यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ प्रमोद लाडवंजारी हे करीत आहे.


Protected Content

Play sound