Home आरोग्य जळगावात मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन

जळगावात मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन


जळगाव ,लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । महर्षी वाल्मिकी युवा संस्था आणि तुलसी गोवर्धन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी १ नोव्हेंबर रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात शिवनेरी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलच्या वैद्यकीय टीमने सहभाग घेत नागरिकांची मोफत तपासणी आणि उपचार केले. महर्षी वाल्मिकी नगर, दिनकर नगर, गुरुदत्त कॉलनी, मेस्को माता, तानाजी मालुसरे नगर परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने या शिबिराला भेट देत आरोग्य तपासणीचा लाभ घेतला.

या आरोग्य शिबिरात हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. शंतनू भारद्वाज, डॉ. अमृताई सोनवणे, डॉ. गौरव सोनवणे, डॉ. दानिश देशमुख यांनी तपासणी व उपचार केले. यावेळी प्रा. प्रताप कोळी, पराग जोशी आणि आकाश सुरेश सोनवणे यांचीही उपस्थिती लाभली. नागरिकांच्या आरोग्याविषयी जागृती निर्माण करणे आणि प्राथमिक उपचार सुविधा उपलब्ध करून देणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.

मोफत रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, नेत्रतपासणी, त्वचारोग आदी तपासण्या या शिबिरात करण्यात आल्या. विशेष म्हणजे, शिबिरात उपस्थित राहिलेल्या नागरिकांना डॉक्टरांनी आरोग्यसल्ला देत नियमित तपासणीचे महत्त्व स्पष्ट केले. स्थानिक रहिवाशांनी अशा प्रकारच्या उपक्रमांचे सातत्याने आयोजन व्हावे, अशी मागणीही यावेळी व्यक्त केली.

 


Protected Content

Play sound