Home Cities एरंडोल एरंडोलमध्ये वंचित बहुजन आघाडीचा पक्षप्रवेश मेळावा !

एरंडोलमध्ये वंचित बहुजन आघाडीचा पक्षप्रवेश मेळावा !


एरंडोल, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहरात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आयोजित पक्षप्रवेश मेळाव्यात मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी प्रवेश करून पक्षात नवीन उर्जा भरली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) चे किसान सेल तालुका अध्यक्ष राजेंद्र चौधरी तसेच एमआयएमचे तालुकाध्यक्ष यांनी समर्थकांसह वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला.

या भव्य मेळाव्यात वंचित बहुजन आघाडीचे जळगाव पश्चिम जिल्हाध्यक्ष ईश्वर पाटील (लाला सर), जिल्हा उपाध्यक्ष हरिचंद्र सोनवणे, आणि जिल्हा सचिव प्रीतीलाल पवार यांनी नव्या कार्यकर्त्यांचे स्वागत करून त्यांना पक्षाचा झेंडा प्रदान केला. यावेळी त्यांनी नव्या कार्यकर्त्यांना संघटनशक्ती वाढविण्याचे आणि सामाजिक न्यायासाठी संघर्ष करण्याचे मार्गदर्शन केले.

पक्षप्रवेशानंतर एरंडोल तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली. राजेंद्र चौधरी यांची एरंडोल तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली. तसेच दीपक लक्ष्मण पाटील (मालखेडा) यांची उपजिल्हाप्रमुख, सत्तार खान अकबर खान यांची अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष, शेख कलीम शेख सलीम उपतालुका अध्यक्ष, बबन वंजारी उपतालुका अध्यक्ष, आणि मुकुंद ठाकूर (विखरण) यांची तालुका संघटक म्हणून नियुक्ती करण्यात आली.

याशिवाय अभयसिंग सोनू पवार (खेडगाव तांडा) तालुका उपाध्यक्ष, ज्ञानेश्वर जुलाल पाटील (कासोदा) शहर प्रमुख, अलाउद्दीन जैनुद्दीन शेख युवा अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष, कामील हमीद मुजावर युवा अल्पसंख्याक शहराध्यक्ष, तसेच आसन खान शकील खान, शेख नुरा सय्यद, परविन पाटील (जवखेडा), विशाल महाजन (निपाणी) आणि दादासाहेब अंबादास लोहार (एरंडोल) या कार्यकर्त्यांनाही विविध जबाबदाऱ्या देण्यात आल्या.


Protected Content

Play sound