जळगाव प्रतिनिधी । जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे कॅरमचे आंतरराष्ट्रीय खेळाडू साजिद खान यांचे अल्पशा आजाराने आज बुधवारी संध्याकाळी मुंबई येथे निधन झाले.
मूळ मुंबई चे असलेले हे साजिद खान यांची शिव छत्रपती पुरस्कार प्राप्त आयशा खान ही पत्नी असून ते दोघेही मागील पाच वर्षां पासून जैन इररिगेशन मध्ये कार्यरत असून जैन स्पोर्ट्स च्या माध्यमाने खेळून विद्यार्थी घडविण्याचे कार्य करीत होते. साजिद खान यांनी अनेक वर्षे राज्य अजिंक्यपद पटकाविले असून राष्ट्रीय स्पर्धेत सुध्दा त्यांनी महाराष्ट्राला पदके मिळून दिलेली आहे. त्यांच्या अकस्मात निधनाने जैन स्पोर्ट्स व कॅरम च्या खेळाडू व पदाधिकारी मध्ये शोककळा पसरली आहे. त्यांचं पश्चात पत्नी आयशा, मुलगा हमजा(६ वर्ष) व वृध्द आई-वडील आहेत. त्यांचा अंत्यविधी मुंबई येथेच गुरुवारी होणार असल्याचे फारूक शेख यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे.