Home क्राईम शस्त्र बाळगून दहशत माजविणाऱ्या हद्दपार गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या

शस्त्र बाळगून दहशत माजविणाऱ्या हद्दपार गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या

0
222


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातून हद्दपार करण्यात आले असतानाही विनापरवाना गावठी पिस्तूल आणि धारदार कोयता बाळगून नेहरू नगर परिसरात दहशत माजविणाऱ्या तीन आरोपींना एमआयडीसी पोलिसांनी सापळा रचून अटक केली. या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातून हद्दपार केलेला आरोपी तेजस दिलीप सोनवणे (वय २५, रा. कांचननगर), खुशाल पितांबर सोनार (वय २१) आणि चेतन पितांबर सोनार (वय २३, दोघे रा. पार्वताबाई ओक नगर) हे तिघे नेहरू नगर परिसरातील संदीपनी बॉईज हॉस्टेलजवळ संशयास्पद स्थितीत फिरत होते. हे तिघेही गावठी पिस्तूल (कट्टा) आणि कोयता घेऊन परिसरात दहशत निर्माण करत असल्याची माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाला मिळाली.

माहितीची खात्री पटताच, गुन्हे शोध पथकाने तात्काळ नेहरू नगरात धाव घेऊन परिसर पिंजून काढला. पोलिसांची चाहूल लागताच आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी वेगाने पाठलाग करून तिघांनाही ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता, आरोपींकडे विनापरवाना गावठी पिस्तूल आणि एक धारदार कोयता आढळून आले. याप्रकरणी पोलीस कर्मचारी किरण पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तिन्ही आरोपींविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Protected Content

Play sound