Home क्राईम सेंट्रींग काम करताना दुसऱ्या मजल्यावरून पडून कामगाराचा मृत्यू

सेंट्रींग काम करताना दुसऱ्या मजल्यावरून पडून कामगाराचा मृत्यू


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । आशाबाबा नगर येथे सेंट्रींग काम करतांना दुसऱ्या मजल्यावरुन पडल्याने गंभीर जखमी झालेले निंबा बंडू पाटील (वय ६०, रा. ममुराबाद, ता. जळगाव) यांचा उपचार सुरु असतांना मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी २४ ऑक्टोबर रोजी रात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

जळगाव तालुक्यातील ममुराबाद येथे राहणारे निंबा पाटील हे सेंट्रींग काम करुन कुटुंबाचा उदनिर्वाह करीत होते. त्यांची शहरातील आशाबाबा नगरात बांधकामाची साईट सुरु होती. दि. २३ रोजी दुपारच्या सुमारास दुसऱ्या मजल्यावर सेट्रींग काम करतांना तोल जावून ते खाली कोसळले. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. याठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरु असतांना त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, भाऊ व वहिनी असा परिवार आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


Protected Content

Play sound