Home क्राईम दवाखान्यात जात असल्याचे सांगून महिला बेपत्ता !

दवाखान्यात जात असल्याचे सांगून महिला बेपत्ता !


धरणगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील निंभोरा गावातून महिला दवाखान्यात जात असल्याचे सांगून शनिवारी १८ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० वाजेपासून घरातून निघून गेली. याबाबत दुपारी १ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे. आशा उत्तम कोळी वय ३१ रा. निंभोरा ता. धरणगाव असे बेपत्ता झालेल्या महिलेचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील निंभोरा गावात आशा कोळी या महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहेत. शनिवारी १८ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० वाजता दवाखान्यात जात असल्याचे सांगून त्या घरातून निघून गेल्या. त्यानंतर त्या घरी परतल्या नाही, त्यांच्या नातेवाईकांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला परंतू कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर त्यांच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. त्यानुसार पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ नितीन पाटील हे करीत आहे.


Protected Content

Play sound