जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धावत्या रेल्वेचा धक्का लागून अनोळखी ५० वर्षीय इसम ठार झाला. ही घटना शुक्रवारी १७ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजता म्हसावदनजीक घडली. मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आला. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील म्हसावद जवळील रेल्वे फाट्याजवळ शुक्रवारी १७ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजता एका अनोळखी 50 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर मृतदेहाचा पंचनामा करून जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला. मयताची अद्याप ओळख पटलेली नाही. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.




