जामनेर, प्रतिनिधी | शहरातील वाकी रोडवरील सम्राट अशोक नगरातील रहिवासी जितेंद्र बाबूराव नेवरे (वय ४५) या धुळे येथील एस.टी. वर्कशॉपमध्ये हेल्पर असलेल्या प्रौढाने आज (दि.२०) सकाळी पंख्याला वायरीने गळफास घेवून आत्महत्त्या केल्याचे उघड झाले आहे.
तो आज सुट्टीनिमित्त आपल्या घरी आला असता राहत्या घरातील वरच्या मजल्यावर सकाळी झोपयाला जातो सांगून गेला, तो बराचवेळ खाली न आल्याने त्याला परिवारातील लोक पाहायला गेले असता त्याने इलेक्ट्रिक वायरने पंख्याला गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. त्याला तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात नेले असता त्याला डाक्टरांनी मृत घोषित केले. त्याच्या पश्चात तीन भाऊ, आई, पत्नी व चार मुली असा परिवार आहे. उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टरांनी शवविछेदन करुन मृतदेह नातेवाईक यांच्या ताब्यात दिला असून याबाबत येथील शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.