Home क्राईम धारदार ब्लेडने तरूणाच्या पाठीवर व पोटावर केले वार !

धारदार ब्लेडने तरूणाच्या पाठीवर व पोटावर केले वार !

0
265


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील हरीविठ्ठल नगर परिसरामध्ये काहीही कारण नसताना एका तरुणाला त्याचा रस्ता अडवून लाथाबुक्क्यांनी मारहाण करत खिशातून ब्लेडने छातीवर व पाठीवर वार करून जखमी केल्याची घटना सोमवार १३ नोव्हेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता घडली आहे. या संदर्भात दुपारी ३ वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, संदीप पप्पू पाटील वय-२४ रा. हरीविठ्ठल नगर जळगाव हा तरुण आपल्या कुटुंबीय सहवास्तव्याला आहे. दरम्यान सोमवारी १३ ऑक्टोबर रोजी सकाळी ९.३० वाजता परिसरात राहणारा भज्या कोळी रा. हरीविठ्ठल नगर याने काहीही कारण नसताना संदीप पाटील यांच्या पाठीवर व पोटावर धारदार ब्लेडने वार करून त्याला गंभीर दुखापत केली. जखमी झालेल्या संदीप पाटील याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात त्याच्यावर उपचार करण्यात आले. या प्रकरणी दुपारी ३ वाजता संदीप पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मारहाण करणारा भज्या कोळी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला ज्याचा पुढील तपास महिला पोलीस कॉन्स्टेबल उषा सोनावणे ह्या करीत आहे.


Protected Content

Play sound