जळगाव प्रतिनिधी । नातेवाईकाला डबा देण्यासाठी रेल्वेस्थानकावर आलेल्या तरूणाची दुचाकी खान्देश मिल परिसरातून अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना शनिवारी उघडकीस आली. याबाबत शहर पोलीसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.
मिळालेल्या माहितीनुसार, अलोक राजेंद्र शिवानी (वय-30, रा. राधेश्याम कॉलनी) हे ६ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास रेल्वेस्थानकावर नातेवाईकास जेवणाचा डबा देण्यासाठी दुचाकीने आला होता. दुचाकी ही खान्देश मिल परिसरातील रस्त्यावर उभी केली होती. दहा मिनिटानंतर डबा देऊन आल्यानंतर त्यास त्याची मोपेड दुचाकी गायब झालेले दिसून आली. परिसरात शोध घेऊन सुध्दा दुचाकी मिळून न आल्याने अखेर ती चोरी झाल्याचे समजले. आज अखेर शनिवारी शहर पोलीस ठाण्यात आलोक याने तक्रार दाखल करण्यात आली.