Home Cities अमळनेर विषारी औषध सेवन केल्याने परप्रांतीय तरूणाचा उपचारादरम्यान मृत्यू

विषारी औषध सेवन केल्याने परप्रांतीय तरूणाचा उपचारादरम्यान मृत्यू


अमळनेर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील दरेगाव येथे परप्रांतीय तरुणाने विषारी औषध सेवन केल्याने उपचारादरम्यान धुळे येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यू झाल्याची घटना घडली होती. यासंदर्भात रविवारी ५ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता मारवड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. कुबडिया सूरसिंग बारिया वय 35 रा. खरगोन मध्य प्रदेश ह.मु.दरेगाव ता. अमळनेर असे मुळे झालेल्या परप्रांतीय तरुणाचे नाव आहे.

अमळनेर तालुक्यातील दरेगाव येथे कुबडीया बारीया हा तरुण आपल्या कुटुंबीयासह वास्तव्याला होता. दरम्यान त्यांनी २० सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजता शेतात विषारी औषध सेवन केले होते. त्यामुळे त्याला अमळनेर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. नंतर त्याची प्रकृती खालावल्याने त्याला धुळे येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरू असताना २४ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजता त्याचा मृत्यू झाला. दरम्यान या घटने संदर्भात चौकशी अखेर रविवारी ५ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता मारवाड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल संजय पाटील करीत आहे.


Protected Content

Play sound