Home उद्योग जागतिक गुंतवणूकदार सप्ताहाचे आ.राजूमामा भोळे यांच्या हस्ते उदघाटन

जागतिक गुंतवणूकदार सप्ताहाचे आ.राजूमामा भोळे यांच्या हस्ते उदघाटन


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शेतकरी व शेतकरी उत्पादक कंपन्यांना वैद्यपदाची ओळख व मक्का गुणवत्ता आधारित प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन अभियंता भवन येथे सोमवारी (६ ऑक्टोबर) करण्यात आले. या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उदघाटन आमदार राजूमामा भोळे यांच्या हस्ते कृषी रथाला झेंडी दाखवून करण्यात आले. एनसीडेक्स, कृषी विकास संस्था व जिल्हा कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने ६ ऑक्टोबर ते १२ ऑक्टोबर जागतिक गुंतवणूकदार सप्ताह हा कार्यक्रम घेण्यात येत आहे. या सप्ताहांतर्गत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे.

देशातील कृषीच्या माध्यमातून शेतकरी स्मार्ट व्हावा, त्याने नवीन टेक्नॉलॉजीने शेती करावी, शेतकऱ्याला स्वतः उद्योजक कसे होता येईल तसेच शेतकरी आत्मनिर्भर कसा होईल. याकडे जागतिक गुंवणूकदार सप्ताहद्वारे केंद्र सरकार प्रयत्न करीत असल्याचे आमदार राजूमामा भोळे यांनी लाईव्ह ट्रेंड्स न्यूजशी बोलतांना सांगितले. ते पुढे म्हणाले की, केंद्र व राज्य सरकारद्वारे प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करुन कमी वेळात शेतीचे अधिक उत्पन्न कसे घेता येईल, याचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. या योजनेतून आदर्श शेतकरी घडविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. या योजनेचा अधिक अधिक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन देखील आमदार भोळे यांनी यावेळी केले. याप्रसंगी आत्मा स्मार्टचे श्रीकांत झांबरे, एनसी डेक्स एफपीओ हेड पंकज भट, नाबार्ड सहाय्यक कृषी महाप्रबंधक अमित तायडे, कृषी विकास संस्थेचे रवी पाटील, धीरज अंबिकार आदी उपस्थित होते.

कृषी विकास संस्था महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश या तिन्ही राज्यात शेतकरी उत्पादक संस्था स्थापन करण्याचे कार्य करते. जळगाव जिल्ह्यात सात उत्पादक कंपन्यांची स्थापना करण्यात आली आहे. २०२०-२१ पासून देशभरात १० हजार शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करण्याचे उद्दिष्ट कृषी विकास संस्थेने ठेवले आहे . जागतिक गुंतवणूकदार सप्ताह अंतर्गत सेबीद्वारा गुंतवणूकदारांमध्ये जनजागृती करणे, गुंतवणूकदारांच्या सोशल मीडियासह इतर माध्यमातून होणाऱ्या फसवणुकीपासून त्यांचे रक्षण करणे हा मुख्य उद्देश आहे. याकरिता ग्रामीण भागात जाऊन शेतकऱ्यांमध्ये याची माहिती देण्यात येत आहे.


Protected Content

Play sound