Home Cities जळगाव शिरसोली प्र.न येथे गांधी जयंती सप्ताहानिमित्त सामूहिक स्वच्छता मोहिमेस उत्स्फूर्त प्रतिसाद 

शिरसोली प्र.न येथे गांधी जयंती सप्ताहानिमित्त सामूहिक स्वच्छता मोहिमेस उत्स्फूर्त प्रतिसाद 

0
264

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  महात्मा गांधी जयंती सप्ताहानिमित्त शिरसोली प्र.न या गावात एक आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला. गांधी रिसर्च फाऊंडेशन आणि ग्रामपंचायत शिरसोली प्र.न यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या सामूहिक स्वच्छता अभियानात ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. या उपक्रमात गावातील नागरिक, ग्रामपंचायत सदस्य, सामाजिक कार्यकर्ते आणि विद्यार्थ्यांनी एकत्र येत स्वच्छतेचा संदेश पसरवला.

ग्रामपंचायत कार्यालय परिसरात राबविण्यात आलेल्या या स्वच्छता मोहिमेला सकाळपासूनच उत्साहाचे वातावरण होते. मोहिमेच्या सुरुवातीला उपस्थित ग्रामपंचायत सरपंच व सदस्य हिलाल भिल्ल, रामकृष्ण काटोले, मुदस्सर पिंजारी, श्रावण ताडे यांनी प्रत्यक्ष झाडू हाती घेऊन सहभाग नोंदवला. सामाजिक कार्यकर्ते गिरीश वराडे यांच्यासह उमेद अभियानातील महिला वर्ग, आरोग्य सेवक प्रवीण भोळे यांनीही स्वच्छता मोहिमेत सक्रीय भाग घेतला.

गांधी रिसर्च फाऊंडेशनचे सहकारी डॉ. अश्विन झाला, सुधीर पाटील, दीपक मिश्रा, प्रशांत सूर्यवंशी, विक्रम अस्वार यांच्यासह पीजी डिप्लोमाचे विद्यार्थीही या मोहिमेत सहभागी झाले. या सर्वांनी एकत्रितपणे रस्ते, सार्वजनिक ठिकाणे व ग्रामपंचायत परिसर स्वच्छ केला. स्वच्छतेच्या माध्यमातून गावाचा चेहरामोहरा बदलण्याचा संदेश त्यांनी दिला.

या उपक्रमातून ‘स्वच्छ गाव, सुंदर गाव’ या संकल्पनेला प्रत्यक्षरूप देण्याचा प्रयत्न करण्यात आला. गावकऱ्यांमध्ये स्वच्छतेविषयी जागरूकता निर्माण होत असल्याचे चित्र यावेळी दिसून आले. उपस्थितांनी अशा उपक्रमांना सातत्याने हातभार लावण्याचा निर्धारही व्यक्त केला. महात्मा गांधींच्या स्वच्छतेच्या विचारांना उजाळा देत, त्यांच्या स्मृती सप्ताहाचे औचित्य साधून हा उपक्रम यशस्वी करण्यात आला.


Protected Content

Play sound