Home Uncategorized जळगावात भारत माता, श्रीराम पूजनासह शस्त्र पूजन उत्साहात

जळगावात भारत माता, श्रीराम पूजनासह शस्त्र पूजन उत्साहात


जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । येथील जळगावचा राजा नेहरू चौक बहुद्देशीय मित्रमंडळातर्फे विजयादशमीनिमित्त भारत माता, श्रीराम पूजन तसेच शस्त्रपूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

प्रसंगी खा. स्मिता वाघ, आ. सुरेश भोळे, जळगाव पीपल्स बँकेचे माजी चेअरमन भालचंद्र पाटील, राज्य पणन महासंघाचे रोहित निकम, माजी नगरसेवक अमित भाटिया, केशवस्मृती समूहाचे अध्यक्ष भरत अमळकर, दीपक जोशी, युवासेनेचे पियुष गांधी हे प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी भारतमाता व भगवान श्रीराम यांच्या प्रतिमेचे पूजन केले. यानंतर शस्त्रपूजन करून विजयादशमीच्या सर्वत्र शुभेच्छा दिल्या. यावेळी मंडळाचे अध्यक्ष अजय गांधी यांचेसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन अश्विनीकुमार काळुंखे यांनी केले.


Protected Content

Play sound