Home Uncategorized बेरोजगाराच्या विवंचनेतून तरूणाने स्वत:ला पेटवून घेतले; उपचारादरम्यान मृत्यू

बेरोजगाराच्या विवंचनेतून तरूणाने स्वत:ला पेटवून घेतले; उपचारादरम्यान मृत्यू


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील राधाकृष्ण नगरात राहणाऱ्या तरूणाने बेरोजगाराच्या विवंचनेतून अंगावर पेट्रोल टाकून पेटवून घेतल्याचा धक्कादायक घटना गुरूवारी २ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता घडली आहे. रात्री ११ वाजता त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. याबाबत शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सुरेंद्र रामसिंग चौधरी वय ३३ रा. राधाकृष्ण नगर, जळगाव असे मयत तरूणाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील राधाकृष्ण नगरात सुरेंद्र चौधरी हा त्याच्या आईसोबत वास्तव्याला होता. सुरेंद्र हा सध्या बेरोजगार होता, याच हाताला काम नसल्याने तो काही दिवसांपासून विवंचनेत होता. गुरूवारी २ ऑक्टोबर रोजी दसरा असल्याने सायंकाळी ६ वाजता त्याची आई जवळच्या दुर्गोत्सवानिमित्त घराच्या बाहेर गेल्या होत्या. त्यावेळी सुरेंद्रने घरात असलेले ज्वलनशील पदार्थ आंगावर ओतून घेत स्वत:ला पेटवून घेतले. त्यानंतर तो आरडाओरड घरात घराच्या बाहेर रोडवर पळत सुटला. त्यावेळी तरूणांनी धाव घेवून अंगावरील आग विझविली आणि त्याला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरू असतांना रात्री ११ वाजता त्याची प्राणज्योत मालविली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


Protected Content

Play sound