भुसावळ प्रतिनिधी । शाब्दीक वादातून बिअरची बाटली फोडून छातीवर काचेने वार करणार्याला पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत वृत्त असे की, पंचशीलनगरात राजेश उर्फ नागेश दिवाकर बरतले आणि शेख सलमान शेख रसीद (वय २५) यांच्यात शाब्दीक वाद झाला. यामुळे राजेश बरतले याने शेख सलमान याच्या छातीवर बिअरची बाटली फोडून वार केला. त्यामुळे शेख सलमान जखमी झाला. नातेवाईकांनी त्याला खासगी हॉस्पीटलमध्ये दाखल केले. दरम्यान, पोलिस निरीक्षक देवीदास पवार यांनी तातडीन सहकार्यांना निर्देश देऊन संशयिताला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्यात परवेज अहमद पिंजारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला. सहायक पोलिस निरीक्षक सारिका खैरनार पुढील तपास करत आहेत.