Home क्रीडा १९ वर्षांखालील महाराष्ट्र क्रिकेट संघ निवड चाचणीला सुरुवात

१९ वर्षांखालील महाराष्ट्र क्रिकेट संघ निवड चाचणीला सुरुवात

0
180


जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अनुभूती निवासी स्कूल, जळगाव येथील क्रिकेट मैदानावर १९ वर्षांखालील महाराष्ट्र राज्य क्रिकेट संघाच्या निवड चाचणी सामन्यांना आजपासून (२४ सप्टेंबर) उत्साही सुरुवात झाली. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MCA) मान्यताप्राप्त या निवड चाचणीसाठी संपूर्ण राज्यभरातून आलेले २७ युवा खेळाडू व १४ रणजी क्रिकेटपटू यांचा सहभाग असून, ही स्पर्धा ३ ऑक्टोबर २०२५ पर्यंत चालणार आहे.

या निवड प्रक्रियेचे उद्घाटन जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष व MCA अॅपेक्स कौन्सिल सदस्य अतुल जैन यांच्या हस्ते नाणेफेक करून करण्यात आले. यावेळी त्यांनी खेळाडूंशी संवाद साधताना सांगितले की, “खेळांमध्ये हार-जीत होणं नैसर्गिक असतं, मात्र खेळाला आदर देणं आणि खेळभावना टिकवणं हेच खरे यश आहे. यातूनच उत्तम व्यक्तिमत्त्व घडतं.”

उद्घाटन प्रसंगी अरविंद देशपांडे, सुयूश बुरकूल, रविंद्र धर्माधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते. पंच म्हणून मुश्ताक अली आणि घनश्याम चौधरी यांनी जबाबदारी पार पाडली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वरुण देशपांडे यांनी केले.

या निवड चाचणीचे आयोजन जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे करण्यात आले असून, जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेड आणि जैन स्पोर्ट्स अकॅडमी यांचे सहकार्य लाभले आहे. संघ निवडण्यासाठी अतुल गायकवाड (रत्नागिरी), शैलेश भोसले (कोल्हापूर), मंगेश भुस्कटे (पुणे), शिरीष कामटे (पुणे), आणि केतन दोशी (कराड) यांचा समावेश असलेल्या निवड समितीने मैदानावर हजेरी लावली आहे.

या निवड प्रक्रियेत सहभागी असलेल्या रणजी खेळाडूंमध्ये महेश म्हस्के, सिद्धांत दोशी, उबेद खान, ऋषिकेश सोनवणे, रणजीत नीका थेम, अभिनव तिवारी, वैभव विभूटे, हर्षल हडके, यश खलाटकर, आयुष बिरादर, अक्षय वाईकर, तनय संघवी, बालकृष्ण कशिद आणि ऋषभ राठोड यांचा समावेश आहे.

यासोबतच महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील निवड झालेल्या २७ युवा खेळाडूंमध्ये मोहीत कटारीया, प्रज्वल मोरे, मोहम्मद अक्रम, अनिश जोशी, शुभम कदम, सुहशिक जगताप, कार्तीक शेवाळे, श्रीवात्सा कुलकर्णी, यतीराज पोतोडे, आयुष रक्ताडे, समांथा धोरनार, साई परदेशी, राम राठोड, एकनाथ देवदे, इंद्रजीत शिंदे, सुश्रुत सावंत, राजवर्धन शितोडे, आर्यन देशमुख, अभिनंदन अदाक, जशन सिंग, व्यंकटेश बेहरे, ओमकार मोगर, रोनक अदानी, अभिषेक आमरे, रितविक रडे, इशान खोंडे आणि हर्षल मिश्रा यांचा समावेश आहे.

स्पर्धेच्या आयोजनासाठी जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे सर्व सहकारी उत्साहाने कार्यरत आहेत. ही निवड चाचणी फक्त निवड प्रक्रियाच नाही तर राज्यातील उदयोन्मुख क्रिकेटपटूंना आपले कौशल्य सादर करण्याची संधी आहे. MCA तर्फे होणाऱ्या या प्रकारच्या चाचण्या क्रिकेट संस्कृतीला घडविण्यात मोठा वाटा उचलतात.


Protected Content

Play sound