Home Cities अमळनेर मोठी बातमी : तंबाखू न दिल्याने तरुणाचा दगडाने ठेचून निर्घृण खून !

मोठी बातमी : तंबाखू न दिल्याने तरुणाचा दगडाने ठेचून निर्घृण खून !

0
196

अमळनेर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर शहरातील हेडावे नाका येथे तंबाखू न देण्याच्या कारणावरून एका तरूणाचा दगडाने ठेचून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी २२ सप्टेंबर रोजी मध्यरात्र १२.३० वाजेच्या सुमारास घडली आहे. याबाबत पहाटे ४ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे. मुकेश भिका धनगर

मुकेश भिका धनगर वय-38 रा.स्वामी विवेकानंद कॉलनी, अमळनेर असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे.

या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी २१ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजता मुकेश धनगर हा घरी येत असताना रस्त्यावरील हेडावे नाका येथे संशयित आरोपी निखिल विष्णू उतकर वय-४५, रा. करंजा पंचवटी, नाशिक याने तंबाखू मागितली. दरम्यान मुकेशने तंबाखू दिली नाही. या रागातून निखिल उतकर या संशयित आरोपीने मुकेशला जमिनीवर पाडून बाजूला पडलेला ओबडधोबड दगडाने तोंडावर व डोक्यावर मारून त्याचा निर्घृण खून केला. दरम्यान या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अमळनेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि संशयित आरोपी निखिल उतकर याला अटक केली. या घटने संदर्भात पहाटे ४ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात मुकेशचा भाऊ दिनेश धनगर यांनी दिलेला फिर्यादीवरून संशयित आरोपी निखिल विष्णू उतकर वय ४५ रा. करंजा पंचवटी नाशिक याच्या विरोधात अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर करीत आहे.


Protected Content

Play sound